Hingoli Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; कापूस, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीला देखील अतिवृष्टीने मोठी बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची दुधाळ व शेतकाम करणारी जनावरे वाहून गेली आहेत

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील महिनाभरात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा प्रचंड फटका बसला असून शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनांकडून याचे पंचनामे कारणात आले असून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे कापूस व सोयाबीन पिकांचे झाले आहे.  

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार ५८ हजार हेक्टर वरील सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीला देखील अतिवृष्टीने मोठी बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची दुधाळ व शेतकाम करणारी जनावरे वाहून गेली आहेत. यामध्ये एका शेतकऱ्यांसह इतर दोन दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे.

पावसानानंतर सोयाबीनवर रोगराई 
संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवर एलो मोझॅक रोगाचा भयंकर प्रकोप पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यात लागवड झाल्याच्या ५० पेक्षा टक्के पेक्षा अधिक सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगाचं सावट आहे. यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असून यावर्षी सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाही. दरम्यान सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

रानडुकरांकडून पिकांचे नुकसान
वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील संतोष रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर रानडुकरांनी मोठा हल्ला चढवला असून उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांचा उपद्रव होत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. आधी अतिवृष्टी नंतर हुमनी अळी आणि आता रानडुकरांचा त्रास या सलग संकटांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रोकडे यांच्या शेतातील काही भागात उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT