Buldhana Nagar Parishad : बुलढाणा नगरपरिषदेची प्रभाग रचना नियमबाह्य; उबाठाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांचा आक्षेप

Buldhana News : प्रभाग रचना स्थळ निरिक्षण न करता बसल्या ठिकाणी कागदोपत्री करण्यात आली आहे. नागरिकांचा गोंधळ वाढवून विशिष्ट पक्षाला, व्यक्तीला फायदा व्हावा या उद्देशाने सदरची प्रभाग रचना करण्यात आली आहे
Buldhana Nagar Parishad
Buldhana Nagar ParishadSaam tv
Published On

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषदेची प्रभाग रचना करणे अपेक्षित असतानाही बुलडाणा नगरपरिषदेने तयार केलेली प्रभाग रचना नियमबाह्य व नागरिकांच्या हिताला बाधक असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी केला आहे. या संदर्भात ॲड. जयश्री शेळके यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निवडणुका होऊ घातल्या असून या अनुषंगाने नगरपालिका व महापालिकेकडून प्रभाग रचना आखल्या जात आहेत. त्यानुसार बुलढाणा नगरपरिषदेने देखील प्रभाग रचना तयार केली आहे. मात्र यावर ठाकरे गटाकडून आक्षेप नोंदविण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रभाग रचना उत्तर दिशेकडून सुरू करून सलग क्रमाने करणे अपेक्षित होते. मात्र बुलडाणा नगर परिषदेने ही प्रभाग रचना वायव्य दिशेपासून सुरू केली असल्यामुळे भौगोलिक सलगता भंग झाल्याचे शेळके यांचे म्हणणे आहे. 

Buldhana Nagar Parishad
Raver Crime : पती- पत्नीच्या वादात घडले भयंकर; पत्नीने संतापाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड मारून पतीला संपविले

अनेक ठिकाणची विभागणी गोंधळात टाकणारी 

नैसर्गिक सीमा जसे की नदी, महामार्ग, रेल्वे मार्ग, प्रमुख रस्ते यांचा विचार न करता प्रभाग ठरवण्यात आल्याने अनेक ठिकाणी विभागणी गोंधळात टाकणारी ठरली आहे. प्रभागांची सीमा नागरिकांना समजेल अशा लँडमार्कऐवजी शेत सर्वे नंबरवर आधारित ठेवण्यात आल्याने प्रभाग रचना अधिकच अस्पष्ट झाली आहे. शिवाय, विदर्भ हाऊसिंग सोसायटीसारखी एकसंध वस्ती मुद्दाम दोन प्रभागांत विभागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Buldhana Nagar Parishad
Nanded : 'आपण यांना पाहिलंत का?' आशयाचे झळकले बॅनर; नांदेडमध्ये मराठा आमदार, खासदार विरोधात मराठा बांधव आक्रमक

प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी 

लोकसंख्येचे संतुलन न पाळता, नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार न करता नगर परिषदेकडून मनमानी पध्दतीने सदर प्रभाग रचना झाल्याचे दिसून येत असल्याचे ॲड.जयश्री शेळके यांनी सांगितले. ही प्रभाग रचना स्थळ निरिक्षण न करता बसल्या ठिकाणी कागदोपत्री करण्यात आली आहे. नागरिकांचा, मतदारांचा गोंधळ वाढवून विशिष्ट राजकीय पक्षाला, व्यक्तीला फायदा व्हावा या उद्देशाने हेतूपुरस्सरपणे सदरची प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. सदर प्रभाग रचना रद्द करून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने प्रभाग रचना करण्यात यावी, अशी ठाम मागणी उबाठाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com