Nanded : 'आपण यांना पाहिलंत का?' आशयाचे झळकले बॅनर; नांदेडमध्ये मराठा आमदार, खासदार विरोधात मराठा बांधव आक्रमक

Nanded News : आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होत आहेत. इतकेच नाही तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केले जात आहे. अर्थात आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. सरकारवर रोष व्यक्त करत असताना आता मराठा आंदोलनात मराठा आमदार आणि खासदार सहभागी नसल्याने 'आपण यांना पाहिलंत का?' अशा आशयाचे बॅनर नांदेडमध्ये लावण्यात आले आहेत. हे बॅनर लावत मराठा बांधवांनी केला आमदार व खासदारांचा निषेध केला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होत आहेत. इतकेच नाही तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केले जात आहे. अर्थात आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांची आहे. 

Nanded News
Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महालक्ष्मी सणावर विरजण; मराठा महिलांनी घेतला निर्णय

मराठा आमदार, खासदारांचा निषेध 

दरम्यान मुंबई येथे सुरू असलेल्या या आंदोलनासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदारांनी आणि खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. मराठा बांधवांनी नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलंत का? अशा आशयाचं बॅनर लावून मराठा आमदार आणि खासदारांचा निषेध व्यक्त केला.

Nanded News
Parbhani : मराठा आंदोलकांना तातडीने पोहचणार मदत; आंदोलनासाठी परभणीत पहिले मदत कार्यालय

साईबाबा चरणी घातले साकडे 

मुंबईत आंदोलन सुरु असून आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली रहावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा; यासाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी साईबाबा चरणी साकडं घातलं आहे. जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली आहे. यासह शिर्डी नगरपरिषेदेसमोर आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com