Parbhani : मराठा आंदोलकांना तातडीने पोहचणार मदत; आंदोलनासाठी परभणीत पहिले मदत कार्यालय

Parbhani News : मदत कार्यालयाच्या माध्यमातून मुंबई मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांना कुठलीही अडचण आल्यास तातडीने मदत पोहोचवली जाणार. तसेच आंदोलकांच्या कुटुंबीयांनाही कार्यालयामार्फत मदतीचा हात दिला जाणार
Parbhani News
Parbhani NewsSaam tv
Published On

विशाल शिंदे 
परभणी
: मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने जात आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी जाणाऱ्या समाज बांधवाना सर्व माहिती मिळावी, तसेच मदत पोहचवण्याच्या अनुषंगाने परभणीमध्ये पहिले मदत कार्यालय सुरु करण्यात आले आहे. अर्थात या ठिकाणाहून समाज बांधवाना सर्व माहिती व मदत मिळणार आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर समाजबांधव मुंबई गाठत आहेत. तर अजूनही समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मदतीसाठी परभणीत खास मदत कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.

Parbhani News
Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महालक्ष्मी सणावर विरजण; मराठा महिलांनी घेतला निर्णय

तातडीने पोहचविली जाणार मदत 

मुंबईतील आंदोलनस्थळी मदत पोहोचवण्यासाठी अन्नधान्य, औषध आणि जीवनावश्यक वस्तू संकलित केल्या जात आहेत. या मदत कार्यालयाच्या माध्यमातून मुंबई मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांना कुठलीही अडचण आल्यास तातडीने मदत पोहोचवली जाणार आहे. विशेष म्हणजे, मेडिकल टीम, बॅकअप टीम आणि आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीची जबाबदारीही या कार्यालयाकडून घेतली जाणार आहे.

Parbhani News
Raver Crime : पती- पत्नीच्या वादात घडले भयंकर; पत्नीने संतापाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड मारून पतीला संपविले

कुटुंबियांनाही मदतीचा हात 

तसेच फक्त मुंबईत गेलेल्या आंदोलकांसाठीच नव्हे तर येत्या काळात मुंबईकडे जाणाऱ्या बांधवांसाठी देखील ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. आंदोलकांच्या कुटुंबीयांनाही या कार्यालयामार्फत मदतीचा हात दिला जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. यासाठी सुरु करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com