Ganesh Festival : सातासमुद्रापार गणरायांची आराधना; विदेशातील महाकाय जहाजावर बाप्पाची स्थापना

Nandurbar News : खानदेशातील अहिराणी कलाकार आदित्य पाटील सध्या जहाजावर शेफ म्हणून काम करतात. जहाजावर असल्यामुळे यंदा गणपती बाप्पाच्या दर्शनाला मुकणार, असं त्यांना वाटलं. पण त्यांनी हार मानली नाही
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: गणेशोत्सव म्हटलं की घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. पण खानदेशातील एका कलाकाराने चक्क समुद्राच्या मध्यभागी जहाजावर गणेशोत्सव साजरा करून एक अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. जहाजावर शेफ म्हणून काम करणाऱ्या आदित्य पाटील तरुणाने आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येत समुद्रावर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली आणि त्यांची मनोभावे पूजा करत आहेत. 

यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. आज गणेश उत्सवाचा सातवा दिवस असून आता उत्सव अंतिम टप्पात आला आहे. ठिकठिकाणी उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात असून अनेकजण या सोहळ्यासाठी घरी येत असतात. मात्र घरी येता न आल्याने कामाच्या ठिकाणी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करून दहा दिवस पूजा केली जात असते. त्यानुसार समुद्रातील जहाजावर कामाला असलेल्या खानदेशातील तरुणाने जहाजावर गणपती स्थापना केली आहे. 

Ganesh Festival
Manoj Jarange : आझाद मैदान खाली करा, पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस, आंदोलनाला परवानगी नाकारली

आकर्षक अशी आरास 

खानदेशातील अहिराणी कलाकार आदित्य पाटील सध्या जहाजावर शेफ म्हणून काम करतात. जहाजावर असल्यामुळे यंदा गणपती बाप्पाच्या दर्शनाला मुकणार, असं त्यांना वाटलं. पण त्यांनी हार मानली नाही. आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी जहाजावरच गणेशमूर्तीची स्थापना केली आणि भारतीय संस्कृतीची झलक सातासमुद्रापार दाखवली. सोप्या साहित्यातून अनोखी आरास देखील साकारलं आहे. 

Ganesh Festival
Buldhana Nagar Parishad : बुलढाणा नगरपरिषदेची प्रभाग रचना नियमबाह्य; उबाठाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांचा आक्षेप

दिव्याऐवजी लागला लाईटचा दिवा 

जहाजावर पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्य मिळणं शक्य नव्हतं. पण या मित्रांनी उपलब्ध साहित्यातूनच गणपतीची सजावट केली. त्यांनी जहाजावर आग पेटवता येत नसल्यामुळे दिव्याऐवजी लाईटचा दिवा वापरला. त्याचप्रमाणे आईस्क्रीमच्या रिकाम्या वाट्या एकत्र जोडून त्यांनी टाळ तयार केले आणि या टाळांच्या तालावर बाप्पाची आरती केली आहे. अशा प्रकारे, जहाजावर काम करणाऱ्या या तरुणांनी एकत्र येत समुद्राच्या मध्यभागी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com