सोयाबीन उत्पादकांसाठी चांगली बातमी; केंद्राचा सोया पेंड आयतीचा विचार नाही Twitter
ऍग्रो वन

सोयाबीन उत्पादकांसाठी चांगली बातमी; केंद्राचा सोया पेंड आयतीचा विचार नाही

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती

दीपक क्षीरसागर

लातूर - राज्यात लातुर हा सोयाबीन उत्पादकसाठी अग्रेसर जिल्हा आहे. मागील काळात देशातील पोल्ट्री व्यावसायिकांनी लॉबी करून सोयाबीन पेंड आयातीला परवानगी मिळवली असताना यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली होती आता यास पूर्णविराम मिळाला आहे. खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

देशात महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे म्हणून लॉबिंग करून 12 लाख मेट्रिक टन सोया पेंडीच्या आयतीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी साडे सहा लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात झाली आहे उर्वरित सोया पेंड आयात करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

आज शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती दिली यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोया पेंडीच्या आयातीचा केंद्राचा विचार नाही असं ट्विट केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT