मुंबई - प्रेमसंबंधातून झालेल्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण करत पसार झालेल्या 60 वर्षीय तस्लीम सिफतहुसैन खान याला नागपाडा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्याकडून मुलाची सुखरूप सुटका करत, त्याला आईच्या ताब्यात देण्यात आले आहेत. नागपाडा येथील एका बार मध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे देखील पहा-
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला बारमध्ये वेटर म्हणून नोकरी करताना तस्लीम सोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. याच प्रेमसंबंधातून तक्रारदार या गर्भवती राहिल्या. त्या गावी निघून गेल्या. मार्च महिन्यात त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मुलगा तीन महिन्यांचा झाल्यानंतर त्या मुलाला घेऊन पुन्हा मुंबईत परतल्या. मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्या पुन्हा वेटर म्हणून कामावर रुजू झाल्या. काही दिवसाने खान घरी आला. मुलावरून महिलेशी वाद घालत मारहाण केली.
त्यानंतर 14 नोव्हेंबरला त्या कामावर जाताच, मुलाला फिरवून आणतो सांगून खान मुलाला घेऊन पसार झाला होता. खानने मुलाचे अपहरण केल्याचे समजता पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. तांत्रिक पुराव्यावरून खान हा उत्तरप्रदेश येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पण खान नवी दिल्ली येथे पळून गेला. पोलिसांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून खानला शोधून काढत मुलाची सुटका केली. नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.