जयेश गावंडे
अकोला - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेहमीच्या पध्दतीने पणन विभागाच्या थेट परवानाधारक असलेल्या नर्मदा साल्वेस प्रा.ली.या कंपनीने अडत्यांकडून सोयाबीन बियाणे खरेदी केले. परंतु, नर्मदा साल्वेस यांनी अडत्यांचे दोन महिने झाले तरी पैसे न दिल्याने आज अडत्यांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. Fraud Of Two crore by a trader in Akola
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आमदार बाजोरिया यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. परंतु, अडत्यांनी त्यांचे ऐकले नाही. शिवप्रकाश कालुराम रूहाटीया आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचा जावेद हुसेन कादरी यास पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हा संपूर्ण व्यवहार एक कोटी 87 लाख रुपयांचा आहे.
हे देखील पहा -
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणन विभागाच्या थेट परवानाधारक नर्मदा साल्वेस प्रा. ली. यांनी सोयाबीन खरेदीसाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचे शेख जावेद हुसेन कादरी यांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. एप्रिल आणि मे महिन्यात नर्मदा साल्वेसने लक्ष्मी सेल्स यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे सोयाबीन अडत्यांमार्फत खरेदी करून माल खरेदी केला नाही अशी भूमिका घेतली. संपूर्ण प्रकरणाची बाजार समितीने अंतर्गत चौकशी करून लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन व नर्मदा साल्वेस यांचे परवाने रद्द केले आहे.
नर्मदा साल्वेससाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनने 11 अडत्यांकडून सोयाबीन खरेदी केले. जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त क्विंटल सोयाबीन विकला. परंतु, नर्मदा आणि लक्ष्मी फर्मकडून दोन महिने उलटूनही व्यवहाराचे पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे अडत्यांनी नर्मदा साल्वेसकडे व्यवहाराचे पैसे मागितले. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.
त्यामुळे अडत्यांनी याबाबत शांततेत प्रकरण निपटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांकडून नकार घंटा येत असल्याने अडत्यांनी याबाबत रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिवप्रकाश रूहाटीया आणि जावेद हुसेन कादरी यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आमदार गोपीशन बाजोरिया यांनी प्रयत्न केला. परंतु, अडते त्यांच्या प्रस्तावावर मान्य झाले नाही. सर्व अडत्यांच्या खात्यात त्यांची देयक रक्कम जमा करा, त्यानंतर प्रकरण मागे घेण्यात येईल अशी भूमिका अडत्यांनी घेतली असल्याने त्यामुळे बाजोरिया यांची शिष्टाई अपयशी ठरली.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.