एफआरपीच्या थकीत रकमेसाठी स्वाभिमानीचे आंदोलन

एफआरपीची रक्कम थकवणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करणार असे साखर आयुक्तांनी म्हटले होते मात्र अजूनही हि कारवाई आलेली नाही. ती कागदोपत्रीच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
एफआरपीच्या थकीत रकमेसाठी स्वाभिमानीचे आंदोलन
एफआरपीच्या थकीत रकमेसाठी स्वाभिमानीचे आंदोलन SaamTv
Published On

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्य़ातील अनेक साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकवली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. मागील गळित हंगामाची एफआरपीची रक्कम अद्यापही कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. Swabhimani's agitation for the overdue amount of FRP

हे देखील पहा -

यंदाचा गळित हंगाम तोंडावर आला असून अद्यापही मागच्याच हंगामाची रक्कम देण्यात आलेली नाही. तर या हंगामाची रक्कम हे कारखानदार कसे देणार असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बगल यांनी केला आहे. एफआरपीची रक्कम थकवणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करणार असे साखर आयुक्तांनी म्हटले होते मात्र अजूनही हि कारवाई आलेली नाही. ती कागदोपत्रीच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

एफआरपीच्या थकीत रकमेसाठी स्वाभिमानीचे आंदोलन
लातूर जिल्ह्यातील 'ते' साखर कारखाने चौकशीच्या रडारवर - आ.संभाजी पाटील निलंगेकर

एफआरपीची रक्कम थकवणाऱ्या या कारखानदारांवर तात्काळ आरआरसीची कारवाई करून थकीत रक्कम असणाऱ्या कारखान्यांच्या चेअरमनसह संपुर्ण संचालक मंडळ निलंबित करून त्या कारखान्यांवर तुकाराम मुंढे यांना प्रशासक म्हणुन नेमावे अशी मागणी स्वाभिमानी कडून करण्यात आली आहे.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com