दुष्काळी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर शेतपिकांचं प्रचंड नुकसान..! विनोद जिरे
ऍग्रो वन

दुष्काळी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; शेतपिकांचं प्रचंड नुकसान..!

दुष्काळी बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

विनोद जिरे

बीड : दुष्काळी बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात हातातोंडाशी आलेला घास वाहून गेलाय अनेक शेतकऱ्यांचे उभी पीकं वाहून गेली आहेत. तर कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. यामुळं आता कुठं पेरावं ? जगावं कसं? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने, शेतकऱ्यांच्या शेतात होत्याचं नव्हतं झालंय. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं. त्यात अनेकांनी दुबार पेरणी देखील केली. मात्र त्यानंतर पाऊस झाल्याने पिके देखील जोमात आली. आता या पिकांनी चांगलाच बहर घेतला होता. उडीद मूग सोयाबीन भुईमूग चांगल्या शेंगा लागल्या होत्या. कापसाने देखील बहर घेतला. मात्र काल रात्री झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने शेतकऱ्यांची उभी पीक वाहून गेले. एवढेच नाही तर बीडच्या पोखरी गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन देखील वाहून गेल्या.

याविषयी शेतकरी शामराव चव्हाण म्हणाले, की रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे उभं पीक वाहून गेले आहे. हे पिक तर वाहून गेलेचं आहे, जमीन देखील वाहून गेली आहे.आज शेतात होत्याचं नव्हतं झालंय. त्यात शासन पीक विमा देत नाही, तीन वर्षापासून पिक विमा भरतोय. मात्र एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे आता आत्महत्या करण्याची वेळ आलीय. त्यामुळं शासनाने आता तरी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी शामराव चव्हाण यांनी केली आहे.

Breaking News : भारताची तालिबान्यांसोबत महत्वपूर्ण बैठक!बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर, केज, माजलगाव, गेवराई, बीडसह सर्वच तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. जिल्ह्यातील रोहितळ, राजापूर, राहेरी, खंडोबाचीवाडी या गावांसह अनेक गावांत पाणी शिरलं होतं. तर अनेक गावांचा नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला होता. त्यांचंबरोबर शेतातील मूग, उदीद, सोयाबीन, भुईमूग, कापूस, मका, ऊस या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे दुष्काळी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 मध्ये CSKवर काळी जादू? थेट BCCIकडे तक्रार; व्हायरल व्हिडिओ आणि पत्राचं सत्य काय?

Rohit Sharma: रोहित शर्मा फीट असूनही प्लेईंग ११ मधून का बाहेर? चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न

लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

सहर शेख यांचे नगरसेवक पद जाणार? बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT