अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केलेल्या तालिबान्यांसोबाबत आज भारताच्या राजदूतांनी विविध विषयावर चर्चा केल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यामध्ये कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचाही मुद्दा भारताने तालिबान सोबत चर्चिला आहे. (Indian envoy meets Taliban representative in Doha)
हे देखील पहा -
भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई याच्यासमवेत बैठक पार पडल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तालिबानच्या राजकीय विषय प्रमुख अब्बास स्टानेकझाई याच्यासोबतच्या बैठकीत अफगाणिस्तानमधील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.
या चर्चेत तालिबानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देखील परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. अफागणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या भारतात परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत हि चर्चा पार पडली. अफगाणिस्तानातून आता अमेरिकन सैन्याने पूर्णपणे माघार घेतली असून काबुल विमानतळावरही आता तालिबान्यांनी कब्जा मिळवला आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांनी तालिबानसोबत केलेली ही बैठक अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.