Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : सरसकट कर्जमाफी द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धुळ्यात आक्रोश मोर्चा

Dhule News : प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केल्यानंतर ते अनुदान फक्त ५० टक्के शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांना ते लवकरात लवकर देण्यात यावे

भूषण अहिरे

धुळे : ठिबक सिंचन योजनेचे अनुदान रखडले असून ते लवकर देण्यात यावे; या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज धुळ्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब या ठिकाणी मोठ्या संख्येने मोर्चेकर्‍यांनी आंदोलन करत प्रचंड घोषणाबाजी केली. 

गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेले ठिबक सिंचन योजनेचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. तसेच दोन वर्षांपासून न मिळाली पीक विम्याची रक्कम देखील (Farmer) शेतकऱ्यांची तात्काळ देण्यात यावी. शासनातर्फे शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केल्यानंतर ते अनुदान फक्त ५० टक्के शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांना ते लवकरात लवकर देण्यात यावे. या आणि आणखी प्रलंबित मागण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. 

शासनाविरोधात घोषणाबाजी 
धुळे (dhule) जिल्हाधिकारी कार्यलयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जिल्हाभरातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी या सर्व मोर्चेकरांनी शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत कर्जमाफी करा, पीक विम्याची रक्कम अदा करा; अशा मागण्या केल्या. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर

Face Care: चेहऱ्यावर नॅचलर ग्लो हवाय? मग पार्लरला जाण्यापेक्षा ५ मिनिटात घरी तयार करा ही पेस्ट करा ट्राय

Yoga Exercise For Summer Season: उन्हाळ्यात तंदुरूस्त राहण्यासाठी कोणती योगासने करावीत?

Pakistan Air Strike : पाकिस्तानवर दिवसाढवळ्या एअरस्ट्राइक; अफगाणिस्तानचा लष्कराच्या तळावर हल्ला, बराकी केल्या उद्ध्वस्त

Weight Loss Tips: घरीच वजन कमी करण्यासाठी काय करावे?

SCROLL FOR NEXT