Dhule News: Cotton Seeds Seized By Agriculture Department Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: गुजरातमधून आलेले कापसाचे बियाणे जप्त; कृषी विभागाची कारवाई, चार जणांवर गुन्हा

Dhule News in Marathi: कापसाच्या बियाण्यांचे आठ पोते पार्सल म्हणून पाठविण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच कृषी विभागाने तेथे छापा टाकत कारवाई केली.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : महाराष्ट्रात गुजरात राज्यातून कापसाचे बियाणे आणून विक्री केली जात असते. यास बंदी असताना अनेक विक्रेते याची विक्री करत असतात. अशाच प्रकारे गुजरातमधून एका खासगी ट्रॅव्हल्सद्वारे (Dhule) धुळे शहरात आणलेल्या चारशे पाकिट कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांचे पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणी चार जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गुजरातच्या (Gujrat) कथित कंपनीचे एचटीबीटी कापूस बियाण्यांची चारशे पाकिटे आठ गोण्यांमध्ये धुळे येथे आणून उतरविण्यात आले होते. गुजरातमधील मोरे टुर्स ॲन्ड कार्गो (अहमदाबाद) ट्रॅव्हल्सने कापसाच्या बियाण्यांचे आठ पोते पार्सल म्हणून पाठविण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच (Agriculture Department) कृषी विभागाने तेथे छापा टाकत कारवाई केली. धुळ्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, कृषी अधिकारी अभर कोर आदींचे पथक पद्‌मालय ट्रॅव्हल्स येथे दाखल झाले. पंच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी सहाय्यक नितीन मासोळे, मनोज पाटील उपस्थित होते. 

मालाचे बिल नाही
कापूस बियाणे पाकिटांसोबत डिलिव्हरी चलन, मालाचे पक्के बिल, ई-वे बिल नियमाप्रमाणे तपासणीत आढळले नाही. यामुळे मालाची अनधिकृत वाहतूक झाल्याचे समोर आले. तपासणीत गोण्यांमध्ये कापसाचे बियाणे फायटर ५ जी, श्रीकॉट ४४ आढळले. त्याची किंमत सहा लाख रुपये आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित व प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे उत्पादन व विपणन करणारी कंपनी, तिचे मालक व जबाबदार व्यक्ती, मोरे टूर्स ॲन्ड कार्गो, महेश व अशोक भाई या चौघांवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दारूच्या नशेत नवऱ्याचं भयंकर कृत्य, भरदिवसा बायकोवर कोयत्याने वार, दोन्ही हात कापले नंतर...

Siddharth Jadhav: चेहऱ्यावर क्रौर्य, नजरेत दरारा; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक

Sai Tamhankar Photos: सईला पाहून वातावरण तापलं, लेटेस्ट फोटो एकदा पाहाच

Maharashtra Live News Update: आदिवासी भगिनींकडून मंत्री भरत गोगावले यांना भाऊबीजेची ओवाळणी

Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT