भूषण अहिरे
धुळे: भाजप आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतेय. तसेच नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर देशातील लोकशाही संपणार असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी सामन्याच्या मुलाखतीत केला होता. त्यांच्या आरोपावरून भाजप प्रदेशाध्यक्षा चंद्रशेखर बावनकुळेंची आगपाखड झालीय. याच आगपाखडमधून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला काळूबाळूचा तमाशा म्हटलंय. तसेच त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा मान्य केलाय. जो जाहीरनामा विशिष्ट धर्माच्या हेतूने प्रेरित असल्याची टीका केलीय. त्याचबरोबर बावनकुळे यांनी प्रियांका गांधींवरही टीका केलीय. प्रियांका गांधी यांनी नंदुरबारच्या सभेत नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून देखील बावनकुळे यांनी प्रियंका गांधी यांचा कर्तृत्व काय असा प्रश्न केलाय. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची मुलगी एवढेच त्यांचे कर्तृत्व असल्याचं प्रियंका गांधी यांच्यावर देखील निशाणा साधलाय. गेल्या १० वर्षात मोदींनी आदिवासींबाबत निर्णय घेतलेत. आदिवासी समाज भाजपसोबत आणि महायुतीसोबत आहेत. काँग्रेसने आदिवासींना कधी आपलं समजलं नाहीये. गेल्या ५५ वर्षात काँग्रेसने आदिवासींसाठी काय केलं. त्यांना कोणी अडवलं होतं, काँग्रेसने आदिवासींवर कसा अन्याय केला, याचे मी १००० उदाहरणं दाखवू शकतो, असं बावनकुळे म्हणालेत.
विजय वडेट्टीवारांनी अजमल कसाबची भूमिका घेतली, देशद्रोही अजमल कसाबला हिरो करण्याचे काम विजय वडेट्टीवारांनी केले. उद्धव ठाकरे यांनी याबाबत आजपर्यंत एकही भूमिका केली नाहीये. असं बावनकुळे म्हणालेत. उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा प्रचार १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी करीत आहेत, असा गौप्यस्फोट देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
विशिष्ट धर्माकर्ता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केलाय. उद्धव ठाकरेंचं संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनाम्याला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला मत देणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह करण्यासारखं असल्याचं बावनकुळे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.