नाशिकच्या सातपूरमधील श्रमिक नगरच्या शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय आहे. बिहार राज्यातील तक्रारदार हे हिंदी भाषिक असून हिंदी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी यांची दोन्ही मुले प्रयत्न करत होती. त्यानुसार तक्रारदार हे शामलाल गुप्ता माध्यमिक शाळेत (School) हिंदी भाषिक मुलांना इयत्ता सातवीच्या वर्गात प्रवेश देण्या या वेळी त्यांच्याकडून प्रवेशाच्या च्या मोबदल्यात पालकांकडून १० हजार रुपयांचा इमारत निधी मागण्यात आला होता.
इमारत निधी घ्यायचा पण त्यासाठी पावती न देता ही रक्कम स्वीकारण्यात आल्याने लाचखोर ५६ वर्षीय मुख्याध्यापक सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा व (Teacher) उपशिक्षक दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे यांना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कामगार असलेल्या या व्यक्तीच्या मुलांना प्रवेश देण्यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक या निमित्ताने समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.