Dhule Fire News Saam tv
ऍग्रो वन

Dhule Fire News : भल्या पहाटे शेतकऱ्यावर ओढवले संकट; गोदामाला आग लागून बियाण्यांसह खत, शेतीपयोगी साहित्य जळून खाक

Dhule News : झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्याला घराच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये हा अग्नी तांडव सुरू असल्याचे लक्षात आले

भूषण अहिरे

धुळे : शॉक सर्किटमुळे शिरपूर तालुक्यातील जयपूर येथील शेतकऱ्याच्या गोडाऊनला आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्याने साठवून ठेवलेला कापूस त्याचबरोबर पेरणीसाठी आणलेली बियाणे, धान्य व साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यास अश्रू अनावर झाले होते.  

पहाटे झोपेतून उठल्यानंतर (farmer) शेतकऱ्याला घराच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये हा अग्नी तांडव सुरू असल्याचे लक्षात आले. या नंतर ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आले. परंतु तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. डोळ्यासमोर दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटरसायकल, चारचाकी वाहन, गहु, मका, कापूस, पेरणीसाठी आणलेली बियाणे, खत यांच्यासह शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली. हे पाहून शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले.  

लाखोंचे नुकसान 

शॉर्ट सर्किटमुळे ही आग (Fire) लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीमध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी या आगीत झाली. खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT