कृषी विभागाकडून भात पीक स्पर्धेचे आयोजन; शेतकऱ्यांना मिळणार बक्षिस... दिलीप कांबळे
ऍग्रो वन

कृषी विभागाकडून भात पीक स्पर्धेचे आयोजन; शेतकऱ्यांना मिळणार बक्षिस...

दिलीप कांबळे

पुळे: मावळमधील कृषी विभागाकडून अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात सध्या सहभाग नोंदवलेल्या शेतकऱ्यांची लगबग बघायला मिळत आहे. भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात सध्या भातकाढणी व भातझोडणीची लगबग चालू आहे. शेतकऱ्यांनी भात पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आपल्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी भात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Department of Agriculture organizes paddy crop competition; Farmers will get rewards)

हे देखील पहा -

यामध्ये मावळमधील सत्तावीस शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कृषी विभागाचे अधिकारी, गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी तसेच इतर स्पर्धक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या स्पर्धेत उत्पादनाची नोंद घेतली जात असून विजेत्या शेतकऱ्यांमधून तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड होणार आहे. कृषी विभागाकडून एक पथक सहभाग नोंदवलेल्या शेतकऱ्यांकडे जाऊन कापणी, झोडपणी आणि आलेले उत्पन्न याची नोंद घेत आहे. तालुक्यातील सर्वात जास्त उत्पन्न आलेल्या शेतकऱ्याला विजयी घोषित करण्यात येणार आहे.

दरम्यान पुसाने येथील शामकांत वाजे यांच्या शेतात येऊन कृषी अधिकाऱ्यांनी सुरवात केली आहे. वाजे यांनी कमी क्षेत्रात एकशे सहा किलो विक्रमी उत्पादन केले आहे. मावळ तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र सुरू असलेल्या या स्पर्धेत विजयी कोण होणार याचीच उत्सुकता मावळ तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांना लागली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढली, अमित शहा यांच्या उपस्थितीत बड्या नेत्याने केला BJP मध्ये प्रवेश

Marathi News Live Updates: नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ,

Larvae in Cadbury: कॅडबरीत आढळल्या अळ्या! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने काय केला खुलासा, वाचा...

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का? बडे नेते तुतारी फुंकणार? VIDEO

Weather Update: चक्रीवादळाचा कहर! मुंबईनंतर 'या' राज्यांमध्ये करणार विध्वंस, पाहा IMD चा नवी अपडेट

SCROLL FOR NEXT