मुंबई: कार्डिलीया क्रुज ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेल्या २ ऑक्टोबरपासून तुरुंगात होता. काल २८ ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्याने त्याच्या अटकेपासून सुटकेपर्यंत राजकारण सुरुच आहे. काल आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे. (Aryan got the bail, now pay attention to the people - BJP's criticism)
हे देखील पहा -
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. केशव उपाध्याय म्हणाले की, ''राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. आता तरी त्या अतीवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्याकडे पहाणार का? वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी महिलांना असुरक्षित वाटते, त्यांना दिलासा मिळणार का? नवाब मलिक आणि संजय राऊत यांवर जनतेच्या प्रश्नांवर कधी तरी पत्रकार परिषद घेणार का?" असे प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान आर्यन खानला काल जामीन मिळाला असला तरी कालची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागली होती. त्यामुळे तो आज घरी परतणार आहे. आर्यनच्या अटकेपासून सुरु झालेले राजकारण आता आर्यनला ताब्यात घेतलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर येऊन पोहोचले आहे. मात्र आर्यनची दिवाळी मन्नतवर होणार हे नक्की.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.