pomegranate saam tv
ऍग्रो वन

Pomegranate Price Drop: गुजरातचं डाळिंब महाराष्ट्रात खातंय भाव, स्थानिक शेतकरी चिंतेत

आज पंढरपूर येथील डाळिंब बाजारात 3 हजार क्रेटची आवक झाली.

भारत नागणे

Pandharpur News :

गुजरात आणि राजस्थानचे डाळिंब बाजारात आल्याने महाराष्ट्रात पिकणा-या डाळिंबाची मागणी घटली आहे. त्यामुळे डाळिंबाच्या दरात प्रति किलो 10 ते 15 रूपयांची घसरण (dalimb price slashed) झाली आहे. परिणामी डाळिंब उत्पादकांची (pomegranate gorvers) आर्थिक कुचुंबणा झाली आहे. (Maharashtra News)

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाळिंब उत्पादन होते. येथील डाळिंब‌ प्रामुख्याने दिल्लीच्या मार्केटमध्ये पाठवले जाते. दरम्यान हेच मार्केट आता गुजरात आणि राजस्थानच्या डाळिंबाने काबीज केले आहे.

रंगाने चकचकीत असलेल्या चांगल्या प्रतीच्या गुजरातच्या डाळिंबाला प्रती किलो 120 ते 125 रूपये असा भाव आहे. महाराष्ट्रातील डाळिंबाला शंभर रूपये पर्यंत दर मिळतोय. याचा महाराष्ट्रातील शेतक-यांना आर्थिक फटका बसत आहे.

आज पंढरपूर येथील डाळिंब बाजारात 3 हजार क्रेटची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला 90 ते 100 रूपये दर मिळाला तर कमी प्रतीच्या डाळींबाला सरासरी 60 रूपयांचा दर मिळाला आहे.

गुजरातचे डाळिंब बाजारात आल्याने महाराष्ट्रातील डाळिंबाचे दर कमी झाल्याचे येथील डाळिंब व्यापारी यसुफ बागवान यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. रंग,चव आणि आकार यामध्ये गुजरात आणि राजस्थान मधील डाळिंब महाराष्ट्रातील डाळिंबा पेक्षा सरस असल्याने बाजारात मागणी वाढल्याचे बाेलले जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यातच आता दिल्लीच्या बाजारात देखील गुजरातच्या डाळिंबाला मागणी जास्त वाढल्याने महाराष्ट्रातील डाळिंबाचे दर कमी झाले आहेत असेही सांगितले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

Weather Forecast : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? वाचा राज्याचा आजचा हवामानाचा अंदाज

Horoscope Today : सावधान! दिवसभरात खर्चाचे प्रमाण वाढते राहणार ; तुमच्या नशिबात आज काय लिहिलं?

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणी टिंगरेंची शरद पवारांना नोटीस, सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT