amravati, buldhana saam tv
ऍग्रो वन

Buldhana News : शेतकऱ्यांची लूट थांबवा, बुलढाण्यात स्वाभिमानी आक्रमक; कृषी केंद्रांसाठी अमरावतीत भरारी पथक

काही बियाणे विक्रेता हे मनमानी भाव व ज्या बियाणेची मागणी असेल ते न देता दूसरं देतात अशी तक्रार आहे.

Siddharth Latkar

- संजय जाधव / अमर घटारे

Buldhana News : सध्या पेरणीचा हंगाम जवळ येत असताना शेतकरी बियाणे - खते खरेदी करण्यात व्यस्त आहेत. अशातच कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करताना दिसत असल्याचे चित्र आहे. बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात एका कृषी केंद्रावर कृषी विभागाने कारवाई केली आहे. (Maharashtra News)

खामगाव (khamgoan) शहरातील अंकुर कृषी केंद्र चालकाने एका शेतकऱ्याला सोयाबीन बियाण्याच्या एका बॅग वर 3600 रुपये किंमत असताना शेतकऱ्याकडून तब्बल 4200 रुपये घेतले अशी तक्रार हाेऊ लागली.

ही तक्रार समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कृषी केंद्र गाठत कृषी केंद्र चालकास चांगलच धारेवर धरले. तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यास पाचारण करून कृषी केंद्र सिल करण्याची करण्यास भाग पाडले.

यामुळे मात्र शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीत लूट होत असल्याचं समोर आलंय. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी हे कृषी केंद्र सिल करून आज सुनावणी ठेवली आहे.

अमरावती भरारी पथकाची स्थापना

दरम्यान अमरावती जिल्ह्यात देखील मागील वर्षी बोगस बियाणांचा सुळसुळाट होता. त्यामुळे अमरावती कृषी विभागाने याची पूर्णपणे यावेळी खबरदारी घेतलेली आहे. बोगस बियाणे,खते व कीटकनाशके योग्य गुणवत्तेच्या मिळेल यासाठी काळजी घेतली आहे, बोगस बियाण्यांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर व एकूण असे 15 भरारी पथके गुणवत्ता तपासणीसाठी तयार करण्यात आले आहे.

काही परवाना धारक औषध , बियाणे विक्रेता हे मनमानी भाव व ज्या बियाणे चि मागणी असेल ते न देता ज्या बियाणे ,खते व औषधीवर जास्त फायदा मिळेल तेच शेतकऱ्यांना देतात तरी शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे मिळणारे परमिटवर बियाणे ,खते व औषधी याची माहिती तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल याची काळजी अमरावती जिल्हा कृषी विभाग घेत आहे अशी माहिती अनिल खर्चांन (जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT