Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

मेथी भाजी

हिवाळ्यात मेथीची भाजी निरोगी आरोग्यासाठी खाल्ली जाते. मेथीच्या भाजीचे विविध प्रकार आहेत.

methi bhaji

सोपी रेसिपी

घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सहज मेथीची भाजी बनवू शकता. आज आपण मेथीची सुकी भाजी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत.

Methi Bhaji | yandex

साहित्य

मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी मेथी, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट, तेल आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.

Methi Bhaji | yandex

भाजी धुवून घ्या

मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी मेथीच्या भाजीची पाने स्वच्छ निवडून, धुवून घ्या. यानंतर भाजी बारीक चिरून घ्या.

methi bhaji

लसूण आणि मिरची परतून घ्या

गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्या.

Methi | yandex

भाजी मिक्स करा

या मिश्रणात बारीक चिरलेली मेथी घाला आणि भाजी चांगली परतून घ्या.

methi bhaji

भाजीवर झाकण ठेवू नका

मेथीच्या भाजीवर झाकण ठेवू नका यामुळे मेथीची भाजीतील कडूपण तसाच राहतो.

Methi Bhaji

शेंगदाणा कूट घाला

भाजीचा शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. शेवटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून सर्व नीट मिक्स करा.

Methi Veg | SAAM TV

सुकी मेथी भाजी तयार

अशाप्रकारे घरच्या घरी तुमची मेथीची सुकी भाजी तयार होईल.

methi bhaji | yandex

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

येथे क्लिक करा..