Wardha News : कुमारिकेवर मातृत्व लादणाऱ्या युवकाला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

या प्रकरणात शासनातर्फे न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.
Wardha News, Court
Wardha News, Courtsaam tv

- चेतन व्यास

Wardha News : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मारण्याची धमकी देत मातृत्व लादणा-या नराधम अमित उर्फ बापू विनोद दरवरेकर (२७, रा. पिपरी मेघे) याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी ही शिक्षा ठाेठावली आहे. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना पीडितेला मनोधैर्य योजनेंतर्गत पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई देण्याचे आदेश केले आहेत. (Maharashtra News)

Wardha News, Court
Kolhapur News : आरोग्य अधिकार्‍यासह लाच घेताना वडिलांसह मुलाला अटक

पीडिता ही १५ वर्षांची होती. संशियत अमित पीडितेच्या भावाचा मित्र असल्याने तो त्यास भेटण्यासाठी पीडितेच्या घरी येत होता. २० ऑक्टोबर २०१५ रोजी अमितने पीडितेला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून निर्जनस्थळी नेत पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पीडितेने नकार दिला, मात्र, अमित याने तिला तुझी बदनामी करेन अशी धमकी देत पीडितेसोबत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Wardha News, Court
Vasantrao Kale Sugar Factory Election : वसंतराव काळे साखर कारखाना निवडणूक: NCP त पडली माेठी फूट, शरद पवारांच्या बैठकीकडे लक्ष

मार्च २०१६ नंतर पीडितेला चक्कर येणे, मळमळ होणे आदी लक्षणे दिसू लागल्याने तिने अमितला ही बाब सांगितली. मात्र, त्याने तिच्याशी बोलणे बंद केले. दोन आठवड्यांनी तिचे पोट दिसू लागल्याने तिच्या आईने विचारणा केली असता घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला.

पीडितेने याबाबतची तक्रार नोंदविली. पीडितेला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असता तिने मुलाला जन्म दिला. पीडितेला झालेले बाळ हे संस्थेला देण्यात आले. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Wardha News, Court
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणात शासनातर्फे न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, सहा. रासायनिक विश्लेषक यांनी पीडितेला झालेल्या मुलीचे वडील आरोपी असल्याबाबत अहवाल दिला तसेच इतर साक्षीदार यांची साक्ष तसेच सरकारी पक्षांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com