Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

Terrace Wall Collapses: डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवर गर्दीच्या वेळी टेरेसची भिंत कोसळल्याची घटना घडलीय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहने आणि दुकानांचे नुकसान झाले.
Terrace Wall Collapses:
Collapsed terrace wall debris seen scattered on Phadke Road in Dombivli East, causing panic among locals.saam tv
Published On
Summary
  • फडके रोडवर ऐन रहदारीत टेरेसची भिंत कोसळली

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली

  • दुकानं आणि वाहनांचे नुकसान, परिसरात घबराट

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज

डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवरील लक्ष्मी सागर इमारतीत आज ऐन रहदारीच्या वेळी धक्कादायक घटना घडली. इमारतीच्या टेरेसवरील भिंतीचा काही भाग अचानक कोसळून थेट रस्त्यावर पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भिंतीचे अवजड तुकडे रस्त्यावर पडल्याने काही दुकानांचे नुकसान झाले असून रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.

Terrace Wall Collapses:
Ravindra Chavan : KDMC साठी भाजपचा स्वबळाचा नारा? १२२ जागांसाठी हजारो कार्यकर्त्यांची तयारी

घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष्मी सागर इमारतीतील सर्व १८ फ्लॅटमधील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून सर्व रहिवासी सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Terrace Wall Collapses:
Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

फडके रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पालिकेकडून परिसराची पाहणी सुरू असून इमारतीची संरचनात्मक तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.दरम्यान, जुन्या व धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा इमारतींची नियमित तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com