Beed News Watermelon
Beed News Watermelon Saam tv
ऍग्रो वन

Beed News: गारांनी टरबुजाचा कलर बदलला; मार्केटमध्ये भाव पडल्‍याने शेतकरी हवालदील

विनोद जिरे

बीड : शेतकऱ्यांच्या बांधावर पुन्हा एकदा लाल चिखल पाहायला मिळालाय. अवकाळी पाऊस आणि टरबुजाचा कलर बदलला आणि मार्केटमध्ये देखील या टरबुजचा भाव पडला. यामुळे बीडमध्ये (Beed) शेतीच्या बांधावर चक्क लाल चिखल पाहायला मिळत असून यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी (Farmer) आर्थिक संकटात सापडल्याने हवालदिल झाला आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने हवालदिल झाला आहे. सततची अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट देखील घोंगावतय. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभा ठाकले असून मुलांचे शिक्षण, वृद्ध आई- वडिलांचा दवाखाना त्याचबरोबर कुटुंब चालवाव कसं? असा प्रश्न समोर असल्याने आता जगायचं कसं? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

दोन एकरवरील टरबूज गेले वाया

बीड शहरालगत असणाऱ्या वासनवाडी येथील शेतकरी किशोर गिराम यांनी आपल्या शेतामध्ये दोन एकरवर (WaterMelon) टरबुजाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना जवळपास १ लाख रुपये खर्च आला होता. निसर्गाने मेहनतीला फळ देत टरबूज देखील चांगले आले होते. मात्र पुन्हा अस्मानी संकट भरसल्याने अवकाळी पाऊस आणि गाराच्या तडाख्याने टरबूज शेती नेस्तनाबूत झाली. या गारपिटीने काही टरबूज वाया गेले, तर काही आलेल्या टरबुजावर झालेल्या गारपिटीने डाग लागले. यामुळे मार्केटमध्ये या टरबूजाला नगण्य किंमत मिळत आहे. यामुळे शेतकरी किशोर गिराम यांनी शेताच्या बांधावरच हे टरबूज फेकून दिले असून जनावरांना देखील हे टरबूज टाकले जात आहेत.

पेरणीच्या दरम्यान पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यानंतर पुन्हा अतिवृष्टीने कहर केला तर आता अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकरी उध्वस्त झाला. हाता तोंडाशी आलेला घास आसमानी संकटांने हिरावून घेतलाय. मात्र जे उरलेलं होतं त्यावरही आसमाणीचा डाग पडल्याने, या टरबुजाला मातीमोल किंमत मिळत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झालीय, त्यांना आधार देण्याची गरज आहे. यामुळे आता शिंदे सरकार या लाल चिखलात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT