Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Navi mumbai Crime: पैसे कमाविण्याचा शॉर्टकट मार्ग काढत नवी मुंबईतील तळोजा येथे राहणाऱ्या प्रफुल्ल पाटील या तरुणाने यूट्यूब वर विडिओ पाहून चक्क बनावट नोटांचा छापखाना काढल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय. याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने प्रफुल्ल सह त्याचा साथीदार प्रतीक येळे याला अटक केलेय.
Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9वी पास तरुणाचा कारनामा
Navi mumbai CrimeSaam Tv

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

नवी मुंबई : पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील असे या आरोपीचं नाव असून त्याने युट्युबवर पाहुन आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी त्याच्या घरातून 2 लाख 3 हजार रुपये किमंतीच्या बनावट नोटा आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलंय.

नवी मुंबईतील प्रफुल्ल नववी पास होता, तो घरच्यांपासून वेगळा राहात होता. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवर मिळवली. याद्वारे त्याने 10, 20, 50, 100 व 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली. मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्याची प्राथमिक माहितीये. मागील तीन चार महिन्यापासून प्रफुल्ल पाटीलनं अशा पद्धतीने बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केल्याचं तपासात आढळून आलंय.

घरातच काढला बनावट नोटांचा छापखाना

2 लाख रुपये किंमतीच्या एकूण 1 हजार 443 बनावट नोटा

50 रुपयांच्या 574 बनावट नोटा

100 रुपयांच्या 33 बनावट नोटा

200 रुपयांच्या 856 बनावट नोटा

प्रफुल्लनं आत्तापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या, या नोटा बाजारात कुठे-कुठे वापरल्या याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मात्र युट्यूब मार्गे पैसे बनवण्याचा शॉर्टकट त्याच्या चांगलचं अंगलट आलायं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com