Jalgaon News: युवक काँग्रेसचा भुसावळ येथे रास्ता रोको; मोदी सरकारचा केला निषेध

युवक काँग्रेसचा भुसावळ येथे रास्ता रोको; मोदी सरकारचा केला निषेध
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्‍याच्‍या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात (Jalgaon News) जोरदार घोषणाबाजी करत फैजपूर- यावल रोडवर युवक काँग्रेसच्यावतीने (Congress) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारची सुरू असलेली दडपशाही याच्या विरोधात घोषणाबाजी करत युवक काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. (Live Marathi News)

Jalgaon News
Jalna News: विक्रीसाठी आणलेली फुलं शेतकऱ्यांनी फेकली नाल्यात; फुलांचाही भाव कोसळला

राहुल गांधी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अडाणी यांच्यामध्ये नेमके कुठले संबंध आहेत? तसेच उद्योगपती अदानी यांच्या कंपनीमध्ये आलेले वीस हजार कोटी रुपये नेमके कुणाचे? यासंबंधीचे प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित करून भविष्यामध्ये मोदी सरकारला अडचणीत आणू शकत होते. परंतु त्या आधीच मोदी सरकारने दडपशाही करत एका खोट्या गुन्ह्याखाली राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावत; तात्काळ त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधींचे वाढते वर्चस्व व राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती मोदी सरकारकडे नसलेले कुठलेही उत्तर, या सर्व भीतीपोटी मोदी सरकारने दडपशाही करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली; असा आरोप यावेळी युवक कॉंग्रेसने केला आहे.

Jalgaon News
Hingoli News: सेनगाव तालुक्यातील ५० गावात पाणी टंचाई; प्रशासन नव्‍हे तर ग्रामस्थ मागवताय टँकर

पोलिसांकडून धरपकड

भुसावळ येथे फैजपूर– यावल रस्‍त्‍यावर यावेळी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मराठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील यांच्‍या नेतृत्‍वात आंदोलन झाले. रास्‍ता रोको आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्‍यात घेत नंतर सोडून दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com