Beed News Onion Saam tv
ऍग्रो वन

Beed News: कांद्याने केला वांदा..अवकाळीने भिजून कांद्याचा चिखल झाला; लाखोंचा खर्च मातीत

कांद्याने केला वांदा..अवकाळीने भिजून कांद्याचा चिखल झाला; लाखोंचा खर्च मातीत

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात अवकाळीने कहर केला असून शेतकऱ्याचा होत्याचे नव्हते केले आहे. शेतात काढून ठेवलेला ६ एकर कांदा (Onion) पावसाने भिजल्याने सडून गेला. लाखोचा खर्च करून पदरात काहीच पडले नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) त्या कांद्यावर चक्क नांगर फिरवलाय. यावेळी कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. (Maharashtra News)

चाकरवाडी (Beed) येथे तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेती करण्याचा निर्णय घेतला. यातून लखन वरपे आणि अशोक अनवणे यांनी तशी तयारी करत यातून सहा एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली. मात्र मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या पावसाने (Rain) हा कांदा संपूर्ण सडून मातीमोल झाला.

दोन लाखाचा केला खर्च

बीडच्या चाकरवाडी गावातील तरुण शेतकरी लखन वरपे यांनी आधुनिक शेतीची कास धरत नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड केली. या लागवडीसाठी खत, बियाणे, मजूर, पाणी, फवारणी असा दोन लाख रुपये खर्चही केला. यातून दहा ते बारा लाखाचे उत्पादन निघेल अशी स्वप्न लखनने पाहिले होते. योग्य वेळी कांदा काढला. मात्र मार्केटमध्ये दर कमी असल्याने दर वाढण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीने घाला घातला.

काढलेल्‍या कांद्यावर नांगर

बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालंय. बीड तालुक्यातील चाकरवाडी शिवारात युवा शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पिकवलेला कांदा अक्षरशः मातीमोल झालाय. त्यामुळे यावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतात काढून ठेवलेला सहा एकर कांदा पावसाने भिजल्याने अक्षरशः चिखल झाला. तर काही ठिकाणी कोंब फुटले म्हणून वैतागलेल्या शेतकऱ्याने या कांद्यावर नांगर फिरवला. त्यावेळी अक्षरशा शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT