Dombivali News: संतापजनक..आई बाहेर गेल्‍याची संधी साधत चिमुकलीसोबत अश्लील चाळे; नराधम गजाआड

संतापजनक..आई बाहेर गेल्‍याची संधी साधत चिमुकलीसोबत अश्लील चाळे; नराधम गजाआड
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

डोंबिवली : सहा वर्षाच्या निरागस चिमुकलीसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्या नराधमाला डोंबिवली (Dombivili) रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नरधम मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणार आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Dombivali News
Nandurbar News: अवघ्या दोन महिन्यात रोखले ११ बालविवाह; ऑपरेशन अक्षताचे यश

सदर पीडित सहा वर्षाची चिमुकली डोंबिवली पूर्व परिसरात कुटुंबासह राहते. आरोपी हा त्याच परिसरात आपल्या नातेवाईकांकडे चार दिवसांसाठी राहण्यासाठी आला होता. या विकृताची वाईट नजर या चिमुकलीवर पडली. पिडीतेची आई बाहेर गेली असताना संधी साधून पीडित मुलीला आपल्या घरी नेले व तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

Dombivali News
Maval News: पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी केले बंद; पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शेतकरी आक्रमक

आईने दरवाजा ठोठावला अन्‌

पीडितेची आई घरी परतल्यानंतर तिच्या मुलाने पीडित मुलगी ही कुंदन यांच्या घरात असल्याचे सांगितले. यानंतर दरवाजा ठोकवला मुलीने रडतरडत दरवाजा उघडला. त्यामुळे पीडितेच्या आईला संशय आला. त्यांनी पीडित मुलीला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी डोंबिवली रामनगर पोलीस (Police) ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com