Maval News: पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी केले बंद; पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शेतकरी आक्रमक

पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी केले बंद; पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शेतकरी आक्रमक
Maval News Pavana Dam
Maval News Pavana DamSaam tv
Published On

मावळ : पवना धरणग्रस्त पूर्णवसनासाठी पवना धरणग्रस्त आंदोलक आक्रमक झाले आहेत. अनेक वर्षांपासून असलेली मागणी अद्याप पुर्ण झाली नसल्‍याने (Maval) मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह पवना धरणग्रस्त आंदोलकांनी (Pavana Dam) पवना धरणावरील पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी बंद केले आहे. (Breaking Marathi News)

Maval News Pavana Dam
Bribe Trap: ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी लाच; एक लाखांचा पहिला हप्ता घेताना स्वच्छता निरीक्षकाला अटक

पवना धरण क्षेत्रातील ८६३ धरणग्रस्तांना प्रत्येकी चार एकर जमिन मिळावी. तसेच एका कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्यावे; या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. जोपर्यंत पुर्नवसन होत नाही; तोपर्यंत पिंपरी चिंचवडला पाणी सोडून देणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Maval News Pavana Dam
Nandurbar News: अवघ्या दोन महिन्यात रोखले ११ बालविवाह; ऑपरेशन अक्षताचे यश

कर्मचाऱ्यांना काढले बाहेर

पवना धरणावर जाऊन आमदार सुनील शेळके यांच्‍यासह (Farmer) शेतकऱ्यांनी येथील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यानंतर पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी बंद करून टाळे ठोकले आहे. यावेळी पोलिस प्रशासन देखील काही करू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com