Aurangabad News in Marathi, agriculture in india today, Agriculture News in Marathi
Aurangabad News in Marathi, agriculture in india today, Agriculture News in Marathi Saam Tv
ऍग्रो वन

तोंड दाबून बुक्यांचा मार! खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लयलूट

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - पेरणीसाठी खतांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून लूट केली जात असल्यानं शेतकरी (Farmer) हैराण झाले आहेत. पेरणीच्या तोंडावर तोंड दाबून बुक्यांचा मार अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सरकारने रासायनिक खताचे दर वाढविल्यामुळे खत विक्रेत्यांनी जुन्या साठ्याचे खत नव्या दराने विक्री सुरू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात. खत विक्रेत्यांची ही नफेखोरी कृषी विभाग थांबवणार का प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (Aurangabad News in Marathi)

हे देखील पाहा -

जुन्या दरात डीएपी दोन हजारात मिळते तर नवीन दर १ हजार ३५० रुपये इतका झालाय. संयुक्त मिश्र खताची जुनी किंमत ही १३०० ते १३६० रुपये होती, ती वाढून १४६० ते १५१० रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक खताच्या एका गुणी मागे दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे खत विक्रेत्यांकडे रब्बीमध्ये आणलेला बराच मोठा साठा उपलब्ध आहे.

आत्ता साठ्यातून खत विक्रेते नफेखोरी करीत असल्याचं शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात सध्या पेरणीच्या तोंडावर मिळेल ते खत आपल्या घरी आणून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच फायदा घेऊन खत विक्रेते शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Maharashtra Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम; ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात, आज घोषणा होणार?

Tamannaah Bhatia Today Inquiry : तमन्ना भाटियाची महाराष्ट्र सायबर सेलकडून होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Prajwal Revanna: सेक्स स्कँडलने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! देवेगौडांच्या नातू अन् मुलावर गुन्हा दाखल; शेकडो क्लिप्स व्हायरल

SCROLL FOR NEXT