आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळींबाला उच्चांकी दर विजय पाटील
ऍग्रो वन

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळींबाला उच्चांकी दर

सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळींबाला प्रति किलो 255 रुपये इतका दर मिळाला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळींबाला प्रति किलो 255 रुपये इतका दर मिळाला आहे. चालू हंगामातील हा दर उच्चांकी ठरला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे देखील पहा -

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्सच्या अडतीमध्ये सांगोला तालुक्यातील शेतकरी सचिन यांच्या चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला हा दर मिळाला आहे. तर त्या खालोखाल दुसऱ्या प्रतीच्या डाळिंबाला 160 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांनी चालू हंगामात हा दर सर्वोच्च असल्याचे सांगितले.

गतवर्षी झालेली अतिवृष्टी, चालू वर्षी सतत झालेला पाऊस, तेल्या, मर रोगाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे डाळींब संकटात सापडले आहे. त्यातच कोरोना, लॉकडाऊन याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. शिवाय त्यामुळेही डाळिंब विक्रीला गती मिळत आहे. त्यामुळे हा दर येणाऱ्या कालावधीत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: व‍िराट कोहलीचा चमत्कारिक षटकार; अख्खा क्रिकेट करिअरमध्ये दुसऱ्यांदा घडलं असं|Video Viral

Maharashtra Live News Update: कांदिवलीत एएनसीची मोठी कारवाई, ५० लाखांचे ड्रग्स जप्त

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

Methi Bhaji Benefits: थंडीत खा मेथीची भाजी, वजन होईल कमी अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT