Amravati News
Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे ६५ टक्के पेरण्या रखडल्या; शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा

Rajesh Sonwane

अमर घटारे
अमरावती
: जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात यंदा मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 

अमरावती (Amravati) जिल्ह्यात सुरवातीला झालेल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. यात साधारण जिल्ह्यात ३५ टक्के पेरण्या झाल्या असून ६५ टक्के पेरण्या अजूनही बाकी आहेत. त्यामुळे बळीराजाला अजूनही पावसाची आस लागली आहे. तर पेरणी केलेल्या पिकांना पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे दमदार पाऊस केव्हा येईल; याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

५ शेतकऱ्यांनी संपविले जीवन 

दुसरीकडे मागील दोन दिवसात विदर्भात ५ शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सततची नापिकी, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, शासनाची न मिळालेली मदत, बँकांनी रोखलेले कर्ज वाटप या विविध कारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact Video: NCCF ने थांबवली कांद्याची खरेदी; घोटाळ्याच्या वृत्तानंतर 67 महासंघांची खरेदी बंद; साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट

PHOTOS: केस चिकट आणि डोक्याला खाज येतेय का?, या सोप्या टिप्स करा फॉलो

Marathi Live News Updates: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची थोड्याच वेळात बैठक

Sweets Disadvantages: जास्त बर्फी खाणं पडेल महागात, आरोग्यसाठी आहे घातक

Shruti Marathe : नजर ना लागो या सौंदर्याला; श्रुती मराठेच्या व्हिंटेज लूकनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT