Contaminated Water : दूषित पाण्यामुळे १३० जणांना बाधा; आरोग्य पथक तळ ठोकून

Nanded News : दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यात दुर्लक्ष झाल्याने येथील नागरिकांच्या हे पाणी पिण्यात येत होते
Contaminated Water
Contaminated WaterSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: दूषित पाण्यामुळे त्रास जाणवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुगाव तांडा या छोट्याशा वाडा वस्तीतील १३० जणांना दूषित पाण्यामुळे बाधा झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Contaminated Water
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात अजूनही १०२७ गावांना टँकरने पाणी पुरवठा; संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५६० टँकर

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुगाव तांडा येथे हा प्रकार घडला आहे. ५०० ते ६०० जणांची वस्ती असलेल्या या तांड्यात मागील अनेक दिवसांपासून दूषित पाणी (contaminated Water) पुरवठा होत आहे. दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यात दुर्लक्ष झाल्याने येथील नागरिकांच्या हे पाणी पिण्यात येत होते. यामुळे ग्रामस्थांना उलट्या, मळमळ, जुलाब होत आहे. 

Contaminated Water
Pomegranate Crop : वातावरण बदलाचा डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

रुग्णांची प्रकृती स्थिर 

याबाबतची माहिती मिळताच मांजरम येथी शासकीय आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे. या पथकाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तब्बल १३० जणांना ही लक्षणे जाणवत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com