Dengue Patient : नाशिकमध्ये महिनाभरात डेंग्यूचे १६१ बाधित रुग्ण; एका संशयित रुग्णाचा मृत्यू

Nashik News : पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार डोके वर काढत असतात. तर पावसाच्या पाण्याचे डबके साचून, किंवा इतर ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असते
Dengue Patient
Dengue PatientSaam tv
Published On

नाशिक : जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा असताना नाशिकमध्ये मात्र डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. जून महिन्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे १६१ बाधित रुग्ण आढळून आले. तर एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. 

Dengue Patient
Contaminated Water : दूषित पाण्यामुळे १३० जणांना बाधा; आरोग्य पथक तळ ठोकून

पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार डोके वर काढत असतात. तर पावसाच्या पाण्याचे डबके साचून, किंवा इतर ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असते. डेंग्यूच्या (Dengue) अळ्या निर्माण होऊन या डासांमुळे डेंग्यूचा फैलाव होत असतो. नाशिकमध्ये (Nashik) जानेवारी ते मे या पाच महिन्यात डेंग्यूचे अवघे ११० रुग्ण आढळले असताना जून महिन्यात मात्र अचानक डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर एका संशयित रुग्णाचा देखील मृत्यू झालाय. 

Dengue Patient
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; अखेर वन विभागाकडून बिबट्या जेरबंद

रुग्णांचा केवळ सरकारी आकडा  

विशेष म्हणजे १६१ बाधित रुग्ण हे केवळ सरकारी आकडा असून प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली असून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेने नोटिसा आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com