Akot News
Akot News Saam tv
ऍग्रो वन

Akot News: कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधींना कार्यालयात डांबले; पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी संतप्त

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : पिकांना सुरक्षा कवच म्हणून शासनाने पीक विमा योजना सुरु केली आहे. मात्र पिकांचे नुकसान झाल्यानंतर देखील केली पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना कृषी कार्यालयात डांबून ठेवले आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यातल्या अकोटच्या तालूका कृषी अधिकारी कार्यालयात हा प्रकार घडला आहे. अकोट तालुक्यातील जवळपास पावणे दोनशे शेतकरी केळीच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. विम्याचे जवळपास ४.७५ कोटी रुपये थकीत आहेत. याबाबत शेतकऱ्यांकडून पाठपुरावा सुरु आहे. तरी देखील कृषी विभाग व विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम देण्यास दिरंगाई केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आज कृषी कार्यलयात धडक दिली. 

यावेळी कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयात स्वत:सह डांबले आहे. (Crop Insurance) शेतकर्यांसोबत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे आंदोलनात सहभागी आहेत. ठोस निर्णय घेतल्याशिवाय कृषी अधिकारी आणि विमा प्रतिनिधींना कार्यालयात डांबून ठेवणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र कार्यालयाचा दरवाजा उघडण्यास आंदोलक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे नकार दिला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज या राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा; नशिबाची मिळणार उत्तम साथ, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : शनिदेवाच्या कृपेने 'या' राशींचे नशीब हिऱ्यासारखं चमकणार

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT