Akola Rain Saam tv
ऍग्रो वन

Akola Rain : अतिवृष्टीमुळे पिकांना फटका; तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, २२ घरांची पडझड

Akola News : यंदाच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. कधी पडला नाही इतका पाऊस मे महिन्यात झाला आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून यामध्ये जीवितहानी देखील झाली आहे

Rajesh Sonwane

अकोला : राज्यात गेल्या महिनाभर अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने जिल्ह्यात दाणादाण केली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान जिल्ह्यात झाले आहे. यामध्ये १५५ गावांतील तीन हजार ७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त २२ घरांची अंशतः पडझड देखील झाली आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाना पाठवण्यात आला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. कधी पडला नाही इतका पाऊस मे महिन्यात झाला आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून यामध्ये जीवितहानी देखील झाली आहे. शिवाय शेती पिकांचे मोठे नुकसान अवकाळीने केले आहे. मे महिन्यात गत काही दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात वैशाखमधील उन्हाचा तडाखा जाणविलाच नाही. 

पावसासह वादळी तडाखा 

दरम्यान अकोला जिल्ह्यात २७ मे रोजी दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागात अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर मेघगर्जनेसह जोराचा वारा असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक व वित्त हानी झाली आहे. 

केळीचे पीक झाले आडवे 

पावसाला सुरुवात झाली असता दोन दिवसात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान अवकाळी पावसाने बार्शी टाकळी तालुक्यात केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीचे झाडे आडवी पडली आहेत. याशिवाय फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नाही, तर जोरदार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेती तयार करण्यास देखील अडचण येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, मध्य-पश्चिम रेल्वेवर धावणार २३८ नव्या एसी लोकल

Shanaya Kapoor: स्टायलिश लूकसाठी कपूर खानदानच्या लाडक्या लेकीला करा फॉलो

Maharashtra Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस

Hair Spa: हेअर स्पा करताय? तर थांबा, आधी 'हे' होणारे गंभीर परिणाम वाचाच

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

SCROLL FOR NEXT