Bindusara Project : बीडकरांची चिंता मिटली; धुवाधार पावसाने बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो

Beed News : मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दमदार हजेरी लावली. या धुवाधार पावसामुळे बीड जिल्ह्यामधील छोटे- मोठी धरण आता फुल्ल झाले आहेत बिंदुसरा प्रोजेक्ट ओव्हरफुल
Bindusara Project
Bindusara ProjectSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: उन्हाळ्यात पाण्याचे संकट उभे राहिले होते. यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. बीड जिल्ह्यासह शहरवासीयांना पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली होती. दरम्यान अवकाळी पावसाने बीडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कारण परिसरात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरवासीयांची तहान भागविणारा बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे नदीला देखील पूर आला आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. याच पावसामुळे बीड शहराची तहान भागवणारा महत्त्वाचा बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दमदार हजेरी लावली. या धुवाधार पावसामुळे बीड जिल्ह्यामधील छोटे- मोठी धरण आता फुल्ल झाले आहेत. यामध्ये बीड शहराचे तहान भागवणारे महत्त्वाचे धरण म्हणजे बिंदुसरा प्रोजेक्ट ओव्हरफुल झाल्याने त्याच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. 

Bindusara Project
Sambhajinagar : सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला; पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई करत तिघेजण ताब्यात

भाजीपाल्याचे दर कडाडले 

धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या पावसात शेती पिकांबरोबरच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे सध्या भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस नागरीकांना आणखी चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Bindusara Project
Electric Shock : दुरुस्तीचे काम करताना घडली भीषण दुर्घटना; वीज प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा मृत्यू, तिघे जखमी

पावसाने माळरानावर हिरवळ 

उन्हाळ्यात चाऱ्याअभावी भटकंती करावी लागणाऱ्या पशुधनाला आता पुन्हा एकदा नैसर्गिक खाद्य मिळू लागल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. माळरानावरील गवताचे नवे कोंवळे अंकुर आणि रानावरील नजरेला सुखावणारी हिरवळ ही निसर्गाने केलेली एक सुंदर देणगी मानली जाते. पशुपालनावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना यामुळे दिलासा मिळाला असून, मेंढपाळ व शेळीपालक पुन्हा चराईसाठी माळरानाकडे वळू लागलेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com