Ahilyanagar News Saam tv
ऍग्रो वन

Ahilyanagar : ओढ्यात सोडले रसायनयुक्त पाणी; शेतातील पिके जळाली; मासेही आढळली मृतावस्थेत

Ahilyanagar News : सुपा एमआयडीसी परिसरात असलेल्या जांभूळ ओढ्यात मोठ्या प्रमाणावर रासायन मिश्रित पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरातील विहिरीचे तसेच कूपनलिकांचे पाणी देखील दूषित झाले आहे

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: रसायन मिश्रित पाणी ओढ्यात सोडण्यात आले आहे. ओढ्यात सध्या पाणी असल्याने शेतकरी ते पिकांना पाणी भरत आहे. मात्र यात रसायन मिश्रित पाणी मिसळल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत. यामुळे आता  शेतकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. इतकेच नाही तर ओढ्या नाल्यांमध्ये असलेले मासे व साप देखील मृतअवस्थे आढळून आले आहेत. 

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी परिसरात असलेल्या जांभूळ ओढ्यात मोठ्या प्रमाणावर रासायन मिश्रित पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरातील विहिरीचे तसेच कूपनलिकांचे पाणी देखील दूषित झाले आहे. या रसायन मिश्रित पाण्यामुळे ओढ्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जळाले असून या रासायनिक पाण्यामुळे आसपासच्या वस्तीवर राहाणाऱ्या नागरिकांचे आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

पिण्याचा पाण्याचा निर्माण झाला प्रश्न 

सुपा एमआयडीसी जवळ असणाऱ्या जांभूळ ओढ्यात अज्ञात व्यक्तीने रसायन मिश्रित पाणी सोडले आहे. या पाण्यामुळे विहिरी आणि कूपनलीकांचे पाणी खराब झाले आहे. तर विहिरीच्या पाण्यावर लालसर रंग आला आहे. त्यामुळे पाणी पिण्यास योग्य राहिले नाही. त्यामुळे जनावरांसह येथील नागरिकांचाही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ओढ्याकाठचे गवतही जळू लागले आहे. 

पिकांना पाणी देण्याची चिंता 

रसायन मिश्रित पाण्यामुळे विहिरीतील मासे ओढ्यामधील साप मृत अवस्थेत आढळून आले आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी हि समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींचे आणि कूपनलिकांचे पाणी शेतातील पिकांना द्यावे की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांसमोर असून हा प्रकार संबंधित ग्रामपंचायत तहसीलदारांना सांगूनही या प्रकारकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT