Orange Farm Saam tv
ऍग्रो वन

Orange Farm : खराब हवामानाचा संत्रा बागांवर रोगाचा प्रादुर्भाव; ३० टक्केच होणार उत्पादन

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात उशिरा व समाधानकारक झालेल्या पाऊसाचा फटका संत्रा बागांना बसला आहे. यंदा नगर तालुक्यात २ हजार हेक्टरच्यावर म्हणजे ९५ टक्के शेतकऱ्यांनी संत्रा फळाची लागवड केली

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : खराब हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. रब्बी पिकांवर याचा परिणाम होत असून संत्रा बागांना देखील याचा फटका बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. संत्रा बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे यंदा संत्रा उत्पादनाला फटका बसला आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्केच उत्पादन होण्याची शक्यता असून संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

अहिल्यानगर जिल्ह्यात उशिरा व समाधानकारक झालेल्या पाऊसाचा फटका संत्रा बागांना बसला आहे. यंदा नगर तालुक्यात २ हजार हेक्टरच्यावर म्हणजे ९५ टक्के शेतकऱ्यांनी संत्रा फळाची लागवड केली. मात्र वातावरणामुळे फळांचा बाहर कमी येणे, पानांची परिपूर्ण वाढ न होणे, झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढणे अशी सर्वत्र स्थिती असल्याने याचा परिणाम संत्रा उत्पादनावर होत असून उत्पादन निम्म्याने घटण्याची भीती आहे.

काजळी रोगांचा प्रादुर्भाव 
मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार अहिल्यानगर मध्ये देखील सततच्या खराब हवामान आहे. या वातावरणाचा फटका संत्रा बागांना बसत आहे. तसेच काजळी रोगाच्या प्रादुर्भावमुळे यंदा संत्रा उत्पादनाला फटका बसला आहे. पानाची व फुलांची पुर्ण वाढ होत नसल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

उत्पादक शेतकरी चिंतेत  

रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संत्री फळांचा आकार व गुणवत्ता यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा संत्रा बागांची लागवड वाढुनही उत्पादन कमी होणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलंमडणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. बागांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

SCROLL FOR NEXT