Ravikant Tupkar : पिकविम्यासाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक; बुलढाणा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या

Buldhana News : पिक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३३ कोटी ८३ लक्ष रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. यामुळे तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी; अशी मागणी रविकांत तुपकर यांनी लावून धरली आहे
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : पीक विमा काढला असताना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला लवकर मिळत नाही. अशातच बुलढाणा जिल्ह्यात एआयसी पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून बुलढाणा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले आहे. 

खरीप व रब्बी पिकांसाठी शेतकरी पीकविमा काढत असतात. मात्र विमा कंपनीकडून काही ना काही त्रुटी काढून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत असतात. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. त्या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. 

Buldhana News
Palghar Rural Hospital : नवजात बाळाच्या उपचारासाठी प्रसूत महिलेचा ८० किमीचा प्रवास; पालघर आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार

पिक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३३ कोटी ८३ लक्ष रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. यामुळे तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी; अशी मागणी रविकांत तुपकर यांनी लावून धरली आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू; असे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाकडे बाकी असलेला कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून देत वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, या मागणीसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Buldhana News
Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जबरी लूट; ३ लाखांची रोकड लांबविणाऱ्या दोघांना अंबरनाथमधून अटक

कृषिमंत्र्यांशी चर्चा 

पिकविम्याची रक्कम मिळावी यासाठी तुपकरानी शेतकऱ्यांसह कृषि अधीक्षक कार्यालयात धडक देत तीन तास ठिय्या दिला. दरम्यान रविकांत तुपकरांनी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावर होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्याचे आश्वासन कृषि मंत्री महोदयांनी दिले आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांच्याशीही रविकांत तुपकर यांनी सविस्तर चर्चा केली व उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित पिकविम्याचा प्रश्न लावून धरण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com