Onion Price : कांद्याला ३ हजार रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी बाजारभाव मिळु लागला आहे. यामुळे साठवणुकीतला कांदा आळेफाटा बाजार समितीत दाखल होऊ लागला आहे. परिणामी बाजार समिती आवारात वाहनांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत. (Maharashtra News)
जुन्नरमध्ये टोमॅटोनंतर नंतर आता कांद्याने भाव खाल्ला आहे. त्यातच नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात येण्यासाठी कांद्याची विक्री व्हावी यासाठी जुन्नर तालुक्यातील शेतक-यांनी साठवणुकीतला कांदा बाजारात आणला आहे.
साठवणुकीतला कांद्याची विक्रमी आवक होऊनही बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. पुढील काही दिवस असाच बाजारभाव राहिल्यास शेतकरी पुन्हा एकदा लखपती होतील अशी शक्यता आहे.
दरम्यान नाफेडची खरेदी कांदा बाजारात आल्यास कांद्याची आवक वाढुन बाजारभाव पडेल असल्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. यापुर्वी वातावरणातील बदल,आणि पाऊसामुळे साठवणुकीतील कांद्याची नुकसान झाले. त्यामुळे वाढत्या बाजारभावामुळे कांद्याचे नुकसान भरुन निघत असल्याने शेतक-यांना वाढत्या बाजारभावामुळे आधार मिळत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.