मनोज जयस्वाल
वाशिम : अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र आता (Washim) वाशिम जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८५७ शेतकऱ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस अन गारपिटीनं झालेल्या नुकसानीपाई ११५ कोटी २६ लाख ६२ हजार ४१३ रुपयांची मदत मिळणार आहे. (Tajya Batmya)
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा (Rain) तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु काही ठिकाणी पहिल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही, तोच आणखी नुकसान झाले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अशी मिळणार भरपाई
सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळं पिकांचं नुकसान झालेल्या (Farmer) शेतकऱ्यांच्या मदतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळं वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीतही वाढ झाली आहे. वाढीव दरानुसार जिरायत पिकांच्या नुकसानासाठी १३ हजार ६००, बागायती पिकांच्या नुकसानासाठी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार प्रतिहेक्टर या दराने भरपाई मिळणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.