Nandurbar News : रुग्णवाहिका नसल्याने अपघातातील जखमींना रिक्षातून नेले रुग्णालयात; खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक वास्तव

Nandurbar News :वारंवार निवेदन देऊन तक्रार करून देखील १०८ ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात वर्षभरात १५ हजार नागरिकांचे अपघातात मृत्यू झाले आहे. हे मृत्यू फक्त अपघातामुळे झालेत, असे नसून काही नागरिकांचे जीव आरोग्य विभागाच्या (Health Department) हलगर्जीपणामुळे देखील गेला असल्याचा प्रकार नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात समोर आला आहे. जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने अपघातात जखमींना रिक्षामधून नेण्याची वेळ आली आहे. (Latest Marathi News)

Nandurbar News
Raghunath Dada Patil News : ...तर साखर कारखान्याच्या अंतराची अट काढून टाका : रघुनाथदादा पाटील

नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात १५ दिवसात १६ अपघाताची (Accident) नोंद झाली आहे. मात्र खांडबारा ग्रामीण रुग्णालयात ॲम्बुलन्स नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदन देऊन तक्रार करून देखील १०८ ॲम्बुलन्स (Ambulance) उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. खांडबारा- विसरवाडी रस्त्यावर झालेल्या दोन मोटरसायकलीच्या अपघातात ४५ मिनिटांपर्यंत वाट पाहून देखील ॲम्बुलन्स न आल्याने नाईलाजाने जखमींना ॲपे रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Nandurbar Bajar Samiti : बाजार समितीत मिरचीची विक्रमी आवक; भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

एकाच झाला मृत्यू 

प्राथमिक उपचारानंतर विसरवाडी रुग्णालयातून ॲम्बुलन्स बोलवून नंदुरबार येथे पाठवण्यात आले. मात्र नंदुरबार रुग्णालयात पोहोचल्यानंतर एकाचा मृत्यू झाला. अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला असून वेळेवर ॲम्बुलन्स मिळाली असती, तर त्यांचे जीव वाचवण्यात यश मिळाले असते अशी भावना व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभाग लक्ष देत नसून गरीब आदिवासींचे आणखीन किती जीव घेणार असा संतप्त प्रश्न खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित यांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com