मनोज जयस्वाल
वाशीम : यंदाच्या खरीप हंगामात लवकर पेरणी केलेल्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली असून शेतकरी विक्रीसाठी बाजारात आणत आहे. मात्र मार्केटमध्ये नवीन सोयाबीनला जुन्यापेक्षा कमी दर मिळत आहे. हे दर तब्बल ६३५ रुपयांनी कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. दरम्यान यंदा झालेल्या अति पावसामुळे सोयाबीन (Soyabean Price) पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाला आहे. लवकर लागवड करण्यात आलेल्या सोयाबीनची काढणी झाली असून सोंगून बाजारात विक्रीस देखील आले आहे. मात्र जुन्या सोयाबीनच्या तुलनेत या नव्या सोयाबीनला ६३५ रुपयांनी कमी दर दिला जात असल्याचे चित्र वाशिमच्या (Washim) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहावयास मिळाले आहे.
नव्या सोयाबीनला ३८०० रुपये दर
वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या आणि जन्या सोयाबीनची एकुण ४३०० क्विंटल आवक झाली. त्यातील जुन्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४४३५ ते ४६४५ रुपयांचा दर मिळाला, तर नव्या सोयाबीनला मात्र प्रतिक्विंटल ३८०० ते ४२७० रुपयांचा दर देण्यात आला. शेतीमालात होत असलेल्या दरातील दुजाभावामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सर उमटत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.