Terrace Farming : टेरेसवर फुलविली सेंद्रिय पद्धतीने शेती; निवृत्त शिक्षकाचा यशस्वी प्रयोग

Maval News : मावळच्या निगडे गावातील गोपाळ कोकाटे हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ असलेल्या दाभडा या गावचे आहेत.
Terrace Farming
Terrace FarmingSaam tv
Published On

मावळ : आजकाल वाढत्या नागरीकरणामुळे आणि इमारतीच्या जंगलामुळे शहरातील हिरवाई कमी होत चालली आहे. यामुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला. शरीराला शुद्ध हवा आणि निसर्गाच सोंदर्य अनुभवण्यासाठी शहरातील नागरिकांचा कल उद्यानाकडे किंवा निसर्गरम्य स्थळ बघण्याकडे असतो. परंतु मावळच्या निगडे गावात एका निवृत्त शिक्षकाने आपल्या स्व:तच्या इमारतीवर टेरेस गार्डन फुलविले आहे. 

मावळच्या (Maval) निगडे गावातील गोपाळ कोकाटे हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ असलेल्या दाभडा या गावचे आहेत. नोकरीनिमित्त ते पुण्यात आले. ज्ञान प्रबोधिनी शाळेत संगीत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. नौकरी लागल्यापासून ते गेली चाळीस वर्षापासून निगडेमध्ये वास्तव्यास आहेत. काही दिवसापूर्वी गोपाळ कोकाटे हे निवृत्त झाले आहे. त्यांना शेती आणि झाडांची अतिशय आवड. आपल्या गावाला पारंपारिक पद्धतीने ते शेती करत होते. शेती करण्याची त्यांना आवड आहे. दरम्यान टेरेस गार्डनच्या माध्यमातून त्यांनी हा शेतीचा छंद जोपासला आहे. 

Terrace Farming
Nandurbar Rain Alert : नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

निगडेमध्ये त्यांच्या एक हजार स्क्वेअर फुटाची सदनिका आहे. या सदनिकेच्या टेरेसवर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने अतिशय मनोहारी शेती फुलवली आहे. किचनमधील असलेले वेस्टेज जेवण आणि पाला पाचोळा यापासून सेंद्रिय पद्धतीचे खत त्यांनी तयार केले. वांगी, टोमॅटो, कारली, तोंडली, दोडका, कढीपत्ता, कोथांबिर, पालक, अशा विविध भाज्या व फळे यांची गार्डन कम शेती फुलवाली आहे. गोपाळ कोकाटे यांनी भाजीपाल्यांबरोबरच फुलझाडांची सुद्धा लागवड केली आहे. बटाटा, रताळी या वेलवर्गीय भाज्यांची लागवड ते करत असतात. यातून निघणाऱ्या भाज्याची ते बाजारात विक्री न करता स्व:त आणि आपल्या नातेवाईकांना तसच मित्रांना देतात. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com