- अमर घटारे
Amravati News : शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालया बाहेर कापूस फेकून केंद्र सरकारचा निषेध नाेंदविला. शेतक-यांनी कापूस दरवाढीसाठी आगामी काळात माेठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra News)
मागील वर्षी कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. मात्र या वर्षी कापसाला 7 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी व शेतक-यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यलयावर कापूस फेकून आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कापसाला प्रतिक्विंटल 13 हजार रुपये भाव होता. मात्र या सरकारने बाहेर देशातून कापसाच्या गाठी आयात करून देशातील कापसाचे भाव पडल्याचा आरोप शेतक-यांनी केला.
यावेळी केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणा देत कापसाला प्रतिक्विंटल 13 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी अमीत अढावू (जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना) यांच्यासह शेतक-यांनी केली.
मोर्शीत रास्ता राेकाे
अमरावतीच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरणात शेतजमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. मोर्शी येथे शेकडो शेतकऱ्यांनी भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीचा बाेजवारा उडाला. जमिनीचा मोबदला व नोकरीसाठी लागणारे दाखले न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले हाेते. दरम्यान आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त हाेता.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.