Pandharpur, Sugarcane, Farmers
Pandharpur, Sugarcane, Farmerssaam tv

Sugarcane Price : 'या' कारखान्याने पहिली उचल केली जाहीर; ऊसदर संघर्ष समितीच्या आंदाेलनाला यश

गेल्या महिन्याभरापासून राज्यभरात ऊसदरासाठी आंदाेलन सुरु आहे.
Published on

Pandharpur News : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या सद्गुरू साखर कारखान्याने पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु ऊसदर संघर्ष समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. (Pandharpur Latest Marathi News)

ऊसदर संघर्ष समितीचे समन्वयक दिपक भोसले म्हणाले गेल्या एक महिन्यापासून ऊसदरासाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलन‌‌ सुरू आहे. आमची मागणी तीन हजार शंभर रुपयांची आहे. त्यातील पहिला हप्ता हा अडीच हजार रुपये मिळावा अशी मागणी आहे.

Pandharpur, Sugarcane, Farmers
Satara News : आप्पा मांढरे गाेळीबार प्रकरण; धक्कादायक माहिती उघड, युवक पाेलिसांच्या ताब्यात

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप अडीच हजार रुपये पहिली उचल जाहीर केलेली नाही. मात्र सद्गुरू साखर कारखान्याने आज ऊसदराची (sugarcane) कोंडी फोडली. भाेसले म्हणाले सद्गुरू साखर कारखान्याने पहिली उचल अडीच हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

Pandharpur, Sugarcane, Farmers
Milk Adulteration Racket : सातशे किलाे पावडर जप्त; दूधात भेसळ करणा-या रॅकेटचा हाेणार भांडाफाेड

आमच्या आंदाेलनाला (aandolan) यश आलेले आहे. अन्य साखर कारखाने जोपर्यंत आमची मागणी पुर्ण करत नाहीत तो पर्यंत त्या - त्या साखर कारखान्याच्या विरोधात ऊसदराचे आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा ऊसदर संघर्ष समितीचे समन्वयक दिपक भोसले यांनी दिला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Pandharpur, Sugarcane, Farmers
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : 'भीमा' वरुन सतेज पाटलांवर धनंजय महाडकांचा गंभीर आराेप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com