Satara News : आप्पा मांढरे गाेळीबार प्रकरण; धक्कादायक माहिती उघड, युवक पाेलिसांच्या ताब्यात

शहराच्या मुख्य परिसरात गाेळीबाराची घटना घडल्याने पाेलिस तातडीने घटनास्थळी पाेहचले.
satara , appa mandhare, police
satara , appa mandhare, policesaam tv

Satara News : सातारा शहरातील राजवाडा परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास आप्पा मांढरे (appa mandhare) यांच्यावर झालेल्या गाेळीबार प्रकरणी तिघांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे. राजवाडा परिसरात घडलेल्या या घटनेची सातारा शहरात आज चाैका चाैकात चर्चा सुरु आहे. (Satara Latest Marathi News)

आप्पा मांढरे यांच्यावर गाेळीबार झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना सध्या पुण्यातील एका रुग्णालयात नेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. (Maharashtra News)

satara , appa mandhare, police
Anti Encroachment Drive At Afzal Khan Tomb Near Pratapgad : 'जावळीच्या खाे-यातील वाघाने आज विषय संपवला'

दरम्यान आप्पा मांढरे यांच्यावर गोळीबार करणा-यांना आणि त्यांना साह्य करणा-या तिघांना एलसीबीने (lcb) ताब्यात घेतले आहे. यामधील दाेघे जण हे अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. साता-यात अल्पवयीन मुले शस्त्र बाळगत असल्याची धक्कादायक माहिती या घटनेच्या निमित्ताने उघड झाली आहे.

satara , appa mandhare, police
Satara News : साता-यातील राजवाडा परिसरात गाेळीबार; आप्पा मांढरे जखमी

या घटनेचा तपास आणि संशयितांना बारा तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आप्पा मांढरे यांच्याबराेबर युवकांचा वाद झाला हाेता. त्यानंतर हा वाद इतका विकाेपाला जाईल याची मांढरे यांना कल्पना आली नसावी. युवकांनी (youth) थेट ते देखील राजवाडा परिसरात त्यांच्यावर गाेळीबार केल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

satara , appa mandhare, police
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : 'भीमा' वरुन सतेज पाटलांवर धनंजय महाडकांचा गंभीर आराेप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com