सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे चारा खराब झाला आहे. यामुळे पशुपालक (Farmer) शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिकांप्रमाणे खराब चाऱ्याचाही पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना सरकारने दिलासा द्यावा. (Nandurbar) शासकीय स्तरावरून चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज माजी मंत्री आमदार ऍड. के. सी. पाडवी यांची मागणी केली आहे. (Latest Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे शेती पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारा पावसामुळे खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावर जगवावीत कशी? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत आहे. मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे. पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे प्रशासनातील अधिकाऱ्यांना या विषयातील गांभीर्य नसल्याचे ही दिसून येत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पशुपालक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. शासकीय स्तरावरून चारा खराब झालेल्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी मदत करावी त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे; अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.