Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Navapur : युरियाचा कृत्रिम तुटवडा; किंमतीपेक्षा अधिक दराने युरिया बॅगची विक्री, शेतकऱ्यांची होतेय अडवणूक

Nandurbar News : युरिया अभावी पिकांची वाढ खुंटली आहे. युरिया खत मिळावे, यासाठी शेतकरी धावपळ करत असून यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार जिल्ह्यात आहे.
Published on

सागर निकवाडे 
नंदुरबार
: अतिपावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे आता पिकांची वाढ होण्यासाठी पिकांना खत देण्याचे काम शेतकरी करत आहे. प्रामुख्याने युरिया खत खरेदी करण्याकडे कल आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. कारण विक्रेत्यांकडून जादा दराने विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला असून शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम साठी युरिया खतांची गरज भासत आहे. यामुळे कृषी केंद्रावर खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान युरिया खत मिळावे, यासाठी शेतकरी धावपळ करत असून यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. युरिया अभावी पिकांची वाढ खुंटली आहे. 

Nandurbar News
Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

इतर खत खरेदीची सक्ती 

नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात युरिया खत सोबत इतर रासायनिक खत खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. तसेच अनेक ठिकाणी युरिया खत किंमत पेक्षा जास्त भावने विक्री होत असल्याची तक्रार देखील शेतकरी करत आहेत. अर्थात कृषी केंद्र चालकांकडून मनमानी आणि युरियाचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. 

Nandurbar News
Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी 

जिल्ह्याभरात चांगला पाऊस होत असून पिकांना युरिया खताची गरज भासत आहे. मात्र युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे होत आहे. असे असताना देखील कृषी विभागातील अधिकारी यांनी आपले ऑफिस सोडून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com